महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे.पण आजकाल एक शब्द सर्वासमोर येत आहे तो म्हणजे ‘फेमिनिझम’. महिला सर्व काही करू शकतात त्यांना पुरुषांची गरज नाही. सामाजामध्ये त्या पुरुषांच्याबरोबर काम करू शकतात. १८४८ मध्ये, अमेरिकेतील महिलांना गुलामगिरीविरोधी अधिवेशनांमध्ये बोलण्यास मनाई करण्यात आली. यामुळे, एलिझाबेथ कॅडी स्टँटन आणि लुक्रेटिया मॉट यांनी न्यू यॉर्कमध्ये पहिले महिला हक्क अधिवेशन केले होते. यामध्ये तिने सुमारे १०० लोकांना एकत्र केले आणि महिलांसाठी नागरी, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हक्कांची मागणी केली.
स्त्रीवाद ही एक अशी चळवळ आहे जी महिलांच्या सामाजिक, राजकीय, कायदेशीर आणि आर्थिक हक्कांसाठी लढते. स्त्रीवाद हा शब्द पहिल्यांदा १८३७ मध्ये एका फ्रेंच दस्तऐवजात वापरण्यात आला होता. हा शब्द समाजवादी चार्ल्स फूरियर यांनी वापरला होता. या दस्तऐवजात त्यांनी भविष्यात महिलांच्या मुक्ततेचे वर्णन केले होते. १९०० च्या दशकाच्या सुरुवातीला हा शब्द महिलांच्या मताधिकाराशी जोडला गेला आणि त्याचा अर्थ अनेक प्रकारे बदलला. विशेषतः, आंतरविभाज्य स्त्रीवादाचा प्रकार जात, वर्ग, धर्म आणि लैंगिक प्रवृत्ती यासारख्या घटकांवर आधारित महिलांना भेदभावाचा सामना कसा करावा लागतो यावर केंद्रित झाला. पण आजकालची परिस्थिती पाहता स्त्रीवाद विवाह नष्ट करत आहे का हा वादाचा विषय झाला आहे. यावेळी डॉ. चांदनी तुगनैत, MD (A.M) सायकोथेरपिस्ट, लाइफ अल्केमिस्ट, कोच आणि हिलर, संस्थापक आणि संचालक, गेटवे ऑफ हीलिंग यांनी या विषयावर त्यांचे मत मांडले आहे.स्त्रीवाद आणि वैवाहिक समीकरणे
डॉक्टारांच्या मते स्त्रीवादाचा विवाहांवर होणारा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम म्हणजे भावनिक जबाबदाऱ्यांचे समसमान विभाजन. पारंपरिक विवाहांमध्ये, स्त्रियांवर घरातील जबाबदाऱ्या, महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवणे आणि भावनिक आधार देण्याची जबाबदारी अधिक असते. या असमतोलामुळे अनेकदा महिलांमध्ये मानसिक थकवा आणि असंतोष निर्माण होतो.
अशा प्रकारे जबाबदाऱ्या सामायिक केल्याने वैवाहिक जीवन अधिक सुदृढ आणि समाधानकारक बनते.आधी बहुतांश घरकाम आणि भावनिक जबाबदारी स्त्रियांवर असायची. यामुळे त्या थकून जात आणि वैवाहिक आयुष्यात तणाव यायचा. स्त्रीवाद याला विरोध करतो आणि दोन्ही जोडीदारांनी घरगुती जबाबदाऱ्या समसमान वाटून घ्याव्यात, असे सांगतो. असे झाल्यास नात्यात अधिक समतोल राहतो.
नात्यातील संवादाचे महत्त्व
पूर्वी बऱ्याचदा पती-पत्नी एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलत नसत. यामुळे गैरसमज वाढायचे. स्त्रीवादामुळे लोकांना आपले विचार आणि भावना स्पष्टपणे मांडण्याचा आत्मविश्वास मिळतो, त्यामुळे नाते अधिक सशक्त होते.कोणत्याही नात्याचे गुपित असते पण स्त्रीवादाच्या टीकेत असे म्हटले जाते की, तो व्यक्तिवादाला प्रोत्साहन देतो आणि समजुतीच्या तडजोडीला कमी लेखतो. मात्र, ही दृष्टीकोन संकुचित आहे. स्त्रीवाद हा प्रामाणिक संवादावर भर देतो, जिथे दोन्ही जोडीदार आपली मते स्पष्टपणे मांडू शकतात. पारंपरिक विवाहांमध्ये, अव्यक्त अपेक्षा आणि दडपलेले भावनांचे ओझे असते, जे संघर्षाला कारणीभूत ठरते. स्त्रीवाद मोकळ्या संवादाला चालना देतो, ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ आणि विश्वासार्ह होतात.
पुरुषाला अधिक निर्णय क्षमता
पूर्वीच्या काळी विवाहामध्ये पुरुषाला अधिक निर्णय क्षमता असायची. स्त्रीवाद हा असमतोल मोडून काढण्याचा प्रयत्न करतो आणि समानतेवर भर देतो. हा बदल सुरुवातीला काही जोडप्यांसाठी आव्हानात्मक वाटू शकतो, मात्र कालांतराने तो नातेसंबंध अधिक परिपूर्ण आणि समाधानकारक बनवतो. जेव्हा दोन्ही जोडीदारांना समान महत्त्व आणि आदर मिळतो, तेव्हा नात्यातील संघर्ष कमी होतो आणि विवाह अधिक सुदृढ होतो.
विवाहाच्या यशस्वीतेची नवी व्याख्या
पूर्वी विवाहाचे यश हे पारंपरिक लिंगभेदांवर आणि समाजाच्या अपेक्षांवर आधारित असे. मात्र, स्त्रीवाद जोडप्यांना त्यांच्या गरजेनुसार वैवाहिक आयुष्याची रचना करण्यास मदत करतो. काहींसाठी दोघांचे करिअर महत्त्वाचे असू शकते, तर काहींसाठी पालकत्वाची विभागणी वेगळी असू शकते. त्यामुळे विवाह केवळ समाजमान्य चौकटीत न बसता जोडप्यांच्या गरजेनुसार अधिक समाधानकारक ठरतो.
मानसिक आरोग्याची जाणीव
स्त्रीवाद हा केवळ समानतेपुरता मर्यादित नाही, तर तो वैयक्तिक विकासालाही प्रोत्साहन देतो. जेव्हा व्यक्ती स्वतःला समजून घेतात, स्वतःचा आदर करतात आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतात अशात त्याचा विवाह देखील चांगला होतो.विवाहात संवाद आणि समजूतदारपणा वाढतो.
स्त्रीवादामुळे विवाह संपुष्टात येत आहेत का?
स्त्रीवादामुळे विवाह तुटतात, हा विचार चुकीचा आणि संकुचित आहे. आजची नाती समानता आणि समजूतदारपणावर आधारित आहेत. जरी स्त्रीवादामुळे पारंपरिक विवाहाच्या नियमांमध्ये बदल होत असले, तरी त्याचा मुख्य उद्देश – समान हक्क, परस्पर सन्मान आणि मोकळा संवाद – हे नाती अधिक मजबूत करण्यासाठीच आहे. त्यामुळे, जर वैवाहिक आयुष्यात काही अडचणी येत असतील, तर त्याचे खापर स्त्रीवादावर फोडणे योग्य नाही.
The articles, news features, interviews, quotes, and media content displayed on this page are the property of their respective publishers and media houses. All such materials have been sourced from publicly available online platforms where our name, views, or contributions have been referenced, quoted, or featured.
Gateway of Healing / Dr. Chandni Tugnait / Others (as applicable) does not claim ownership over any external media content reproduced or linked here. The purpose of displaying these articles is solely for informational use, record-keeping, and to acknowledge media mentions related to our work.
Full credit for authorship, editorial content, and intellectual property rights belongs to the original publishers, journalists, and media organizations.
If any publisher or rights holder wishes to request modification, updated attribution, or removal of any content featured on this website, they may contact us at info@gatewayofhealing.com, and we will take appropriate action promptly.
Read the Article on Author's webpage - CLICK HERE

